मुंबईसह ५ टोलनाके सुरुच राहणार : राज्य सरकार

मुंबई एंट्री पॉईंटचे पाच टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. शासनच्या अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील ५ टोल नाक्यांवर ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करायची आहे. 

Updated: Dec 11, 2015, 07:21 PM IST
मुंबईसह ५ टोलनाके सुरुच राहणार : राज्य सरकार title=

नागपूर : मुंबई एंट्री पॉईंटचे पाच टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. शासनच्या अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील ५ टोल नाक्यांवर ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करायची आहे. 

टोल सुरु राहणार आहेत. त्याचप्रमणे कंत्राट रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यामुळे टोलमधून सुटका नाही, हेच दिसून आलेय.

मुंबई एंट्री पॉईंटच्या ५ टोलनाक्यांमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्सचर कंपनीला ११७६ कोटी प्राप्त झालेत. मुंबई टोलबाबत जी समिती नेमली आहे. त्या समितीच्या अहवालावर हे टोल रद्द होतील की नाही हे ठरेल. मात्र, हे कंत्राट रद्द करणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.