मुंब्राच्या तरूणीवर ड्रग्स देऊन बलात्कार?

ठाण्यातील मुंब्रामधील बेपत्ता तरूणी जखमी अवस्थेत सापडली आहे. खालापूर नाक्याजवळ गाडीजवळ ही तरूणी आढळली आहे. या तरूणीवर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप तरूणीच्या पालकांनी केला आहे. हा बलात्कार पीडित तरूणीच्या मित्रांकडूनच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Aug 25, 2015, 11:47 AM IST
मुंब्राच्या तरूणीवर ड्रग्स देऊन बलात्कार? title=

मुंब्रा : ठाण्यातील मुंब्रामधील बेपत्ता तरूणी जखमी अवस्थेत सापडली आहे. खालापूर नाक्याजवळ गाडीजवळ ही तरूणी आढळली आहे. या तरूणीवर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप तरूणीच्या पालकांनी केला आहे. हा बलात्कार पीडित तरूणीच्या मित्रांकडूनच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही तरूणी सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे, या तरूणीवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही तरूणी शुद्धीवर आल्यानंतर अनेक गोष्टींना वाचा फुटणार आहे. 

ठाण्यातील मुंब्रा पोलिस आणि राजगडमधील खालापूर पोलिस आता संयुक्तपणे या घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा या तरूणीच्या मित्रांवर दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.