विहिरीवर पाणी भरलं म्हणून शिव्या देऊन हाकलून लावलं, 'अॅट्रॉसिटी' दाखल

एकविसाव्या शतकात, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Updated: Aug 27, 2015, 08:59 AM IST
विहिरीवर पाणी भरलं म्हणून शिव्या देऊन हाकलून लावलं, 'अॅट्रॉसिटी' दाखल title=

नांदेड : एकविसाव्या शतकात, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

मातंग समाजातील लोकांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मनाई करण्यात आलीय. एवढंच नव्हे तर बुरसट विचारांच्या मंडळींनी मातंग समाजातल्या कुटुंबांना वाळीतही टाकल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. हदगाव तालुक्यातील चोरंबा या गावात ही घटना घडलीय.

अधिक वाचा : 'जातीयवादा'वरून तावडे-जाधवांमध्ये जोरदार जुंपली

दोन दिवसांपुर्वी मातंग समाजातील स्त्रियांनी पाणी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिव्या देऊन हाकलून लावण्यात आलं.

अधिक वाचा : मोबाईल रिंगटोनचं निमित्त... आणि जातीयवादातून आणखी एक हत्या

याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.