शिशुगृहाच्या नावाखाली मुलांच्या विक्रीचा धंदा उघड

एका जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यानं शिशुगृहातून बाळ विकल्याचं समोर आलंय. 

Updated: Apr 22, 2016, 12:11 PM IST
शिशुगृहाच्या नावाखाली मुलांच्या विक्रीचा धंदा उघड title=

मुंबई : एका जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यानं शिशुगृहातून बाळ विकल्याचं समोर आलंय. 

नांदेडमधल्या सत्यश्री गुट्टे हिनं मुंबईतल्या एका जोडप्याला हे बाळ विकलं होतं. गुट्टे नांदेडमध्ये कंत्राटीपद्धतीवर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट संचालित सुनिता गुट्टे शिशुगृह या नावाने ती शिशुगृह चालवायची. 

लहान मुलांची विक्री?

तिचा पती नागेश तिथे अधिक्षक म्हणून काम पहायचा. अनाथ आणि टाकलेल्या मुलामुलींचं इथे पालनपोषण केलं जायचं. पण त्यामागे गोरखधंदाही चालायचा. 

दोन वर्षांपूर्वी मुलीला विकल्याचं उघड 

दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या ताडदेवमधल्या एका जोडप्यानं एक मुलगी या दाम्पत्याकडून विकत घेतल्याचं निनावी पत्र मुंबई पोलिसांना मिळालं. पोलिसांनी जोडप्यासह त्यांच्या दोन नातेवाईकांना अटक केली. त्यांच्याकडून गुट्टे दाम्पत्याविषय़ी माहिती मिळाली.

शिशुगृहाची झाडाझडती

मुंबई पोलिसांनी नांदेड गाठून या शिशुगृहाची झाडाझडती घेतली. त्यावेळी नोंदणीपेक्षा एक बाळ जास्त असल्याचं आढळलं आणि या बाळ विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला. गुट्टे दाम्पत्यानं आणखी काही बाळांची विक्री केली? का याचा तपास आता सुरू झालाय.