नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.

Updated: Sep 17, 2014, 06:26 PM IST
नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार title=

कणकवली: नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.

दोनच दिवसांपूर्वी निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यामुळं काँग्रेस देखील या धामधुमीत मागं नसल्याचं राणेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आघाडीतील जागावाटपाचा गुऱ्हाळ आणखी सुटलं नसल्यानं या यादीत काँग्रेसच्या कुठल्या जागांचा समावेश होतो, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.