नाशिक जिल्ह्यातील २५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

गोदावरीला आलेल्या भयंकर पुरामुळे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधल्या सायखेडा गावातून बाराशे, तर चांदोरीतल्या एक हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. नाशिक महापालिका आणि स्थानिकांनी ही बचावमोहीम राबवली. 

Updated: Aug 3, 2016, 11:37 PM IST
नाशिक जिल्ह्यातील २५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं title=

नाशिक : गोदावरीला आलेल्या भयंकर पुरामुळे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधल्या सायखेडा गावातून बाराशे, तर चांदोरीतल्या एक हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. नाशिक महापालिका आणि स्थानिकांनी ही बचावमोहीम राबवली. 

एनडीआरएफच्या जवानांनी याच भागात पुराच्या विळख्यात अडकलेल्या दोनशे जणांना बाहेर काढलं. बुधवारी एनडीआरएफच्या पथकांकडून करंजगाव इथल्या १६, सायखेडामधल्या ४० जणांना पुराच्या विळख्यातून बाहेर काढलं. 

सध्या चांदोरीमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्यांच्या बचावकार्यासाठी एनएडीआरएफचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. चांदोरी आणि सायखेड्यासह अनेक गावं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.