नाशिक : तीर्थस्थळ असलेल्या नाशिकमध्ये एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
'नाशिक एस्कॉर्ट' नावाने असलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून शहराच्या कोणत्याही भागात मुली पुरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे शहराच्या मध्यवस्तीत एका हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी दोघा एजंट्सना ताब्यात घेत दोन मुलींची सुटका केली.
रॅकेटचा हा कारभार मुंबईतून चालत असल्याचं उघड झाले आहे. कमीत कमी पाच हजार रूपयांपासून पैशाची बोली सुरु होते. नाशिकच नाही तर मुंबई, पुणे, ठाण्यासह देशाच्या मेट्रो सिटीमध्ये अशा वेबसाईटचं जाळं पसरलं असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
नाशिकमध्ये पर्यटकांची संख्या जास्त असल्याने नाशिकबाहेरच्या ग्राहकांचीही संख्या जास्त असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.