नाशिक-पुणे प्रवास आता झाला सुखकर

आता हा प्रवास 3 तासात पुर्ण होवु शकेल या मार्गा वरील चंदनापुरी आणि एकल हे दोन घाट आता सोपे करण्यात आले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 14, 2017, 05:28 PM IST
नाशिक-पुणे प्रवास आता झाला सुखकर title=

नाशिक : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाशिक -पुणे महामार्ग एन एच 60 दरम्यानचा खेड सिन्नर हा 137 किलो मीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे नाशिक-पुणे प्रवास सुपरफास्ट झालाय पूर्वी या रस्त्यावरून प्रवास करतांना नाशिक पुणे हे अंतर कापण्यास 6 तास लागत होते.

आता हा प्रवास 3 तासात पुर्ण होवु शकेल या मार्गा वरील चंदनापुरी आणि एकल हे दोन घाट आता सोपे करण्यात आले आहेत.

नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्यात विद्यार्थी आणि आयटी क्षेत्रातील मंडळीचा मोठा प्रमाणात समावेश आहे.यामुळे आता नाशिक-पुणे प्रवास खऱ्या अर्थाने सुखकर होणार आहे.