नवी मुंबईत मुंढेनी दणका दिलेल्या अधिकाऱ्याकडे पुन्हा महत्वाचे पद

महापालिका स्थायी समितीत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी जी. व्ही. राव यांना पुन्हा सहाय्यक शहर अभियंता पदावर नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2017, 03:16 PM IST
नवी मुंबईत मुंढेनी दणका दिलेल्या अधिकाऱ्याकडे पुन्हा महत्वाचे पद title=

नवी मुंबई : महापालिका स्थायी समितीत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी जी. व्ही. राव यांना पुन्हा सहाय्यक शहर अभियंता पदावर नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जी. व्ही. राव यांचे सहाय्यक शहर अभियंता पद काढून घेतले होते. मुंढे जाताच भ्रष्ट अधिका-यांना पुन्हा घेण्यासाठी नगरसेवक सरसावलेत. 

दरम्यान, शिवसेना नगरसेवकांचा विरोध असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला गेलाय. त्यामुळे राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असल्याची कुजबूज पालिका वर्तुळात सुरु आहे.