शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांना संभ्रम, यामागचं कारण...

राज्यातील सरकारबद्दलच्या शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारंवार बदलत्या भूमिकेमुळे सगळ्यांना कन्फ्युज केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू दिलं नाही. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच जेल भरो आंदोलनही केलं. मात्र आता शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कारणीभूत असावी की व्यसनाधीनता असा प्रश्न आता शरद पवारांना पडलाय.

Updated: Sep 23, 2015, 09:39 PM IST
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांना संभ्रम, यामागचं कारण...  title=

अखिलेश हळवे/श्रीकांत राऊत, झी मिडिया यवतमाळ: राज्यातील सरकारबद्दलच्या शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारंवार बदलत्या भूमिकेमुळे सगळ्यांना कन्फ्युज केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू दिलं नाही. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच जेल भरो आंदोलनही केलं. मात्र आता शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कारणीभूत असावी की व्यसनाधीनता असा प्रश्न आता शरद पवारांना पडलाय.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादीची जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनातील घोषणाबाजी... शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात आक्रमक आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाची १० दिवसांपूर्वीच सरकारविरोधात राष्ट्रवादीनं हे आक्रमक आंदोलन केलं. 

आणखी वाचा - सत्तेत असतांना किती धरणं बांधली? विखे पाटलांचा पवारांना सवाल

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला व्यसनाधीनता आणि प्रेमप्रकरणं जबाबदार असल्याच्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांच्या वक्तव्यावरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुफान टीका केली. आता मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषा बदलली आहे. कर्जमाफीची मागणी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात आक्रमक असलेल्या शरद पवारांची भाषा आता सामोपचाराची झाली आहे.

शरद पवारांच्या या बदललेल्या भूमिकेमुळं काही प्रश्न निर्माण झाले आहेत - 

- भाजपा सरकारनं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामागे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे फास आवळले आहेत.
- दुसरीकडे जगनमोहन दालमिया यांच्या निधनानं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची रिक्त झालेली खुर्ची शरद पवारांना खुणावतेय.
- बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बसायला पंतप्रधान आणि सत्ताधाऱ्यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे

आणखी वाचा - दुष्काळाला शरद पवारच जबाबदार : काँग्रेस

या गोष्टी लक्षात आल्यामुळं शरद पवार सरकारविरोधात मवाळ झालेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. मागील दहा वर्ष कृषिमंत्री असलेल्या शरद पवारांना शेतकरी आत्महत्या का करतात? हा प्रश्न आता पडलाय. त्यामुळंच वारंवार भूमिका बदलणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा एकदा नवा संभ्रम निर्माण केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.