www.24taas.com, महाराष्ट्र
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
दुष्काळ निवारणासाठी सरकारनं नव्या घोषणा केल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टँकर्स सुरू करण्याचे अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आलेत. चोवीसशे गावांतल्या नळ पाणी योजनांचं 67 टक्के वीज बिल राज्य सरकार भरणार आहे. चारा छावणी आता अनामत रक्कम न भरताही सुरू करता येणार आहे.
केंद्राकडे तीन लाख मेट्रिक टन धान्याची मागणी करण्यात आलीय. त्याचबरोबर गरज पडल्यास कोयनेतलं पाणीही देण्यात येणार आहे. अशा विविध घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.