नागपूर : मराठा आरक्षणाबाबत तातडीनं भूमिका घेतली गेली नाही, तर बुलेटनं नाही तर बॅलेटनं उत्तर देऊ असा इशारा, मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळानं दिला आहे.
नागपूर विधानभवनात जाऊन दोन वाजण्याच्या सुमाराला मराठा मोर्चा शिष्टमंडळानं मुखमंत्र्यांची भेट घेतली. त्याआधी सकाळी नागपूरमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
सर्वपक्षीय आमदार या मोर्चात सहभागी झाले होते. मॉरीट टी-पॉइंट इथं या मोर्चाची सांगता झाली. सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.