नाशिक : नोटाबंदीनंतर सुरळीत झालेला चलनपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालाय. विविध शहरांमध्ये एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे पाहायला मिळतेय.
नाशिक जिल्ह्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. जिल्ह्यात तर दोन दिवस पुरेल इतकेच चलन बँकांकडे आहे. यांत स्टेट बँकेच्या शहरातील शाखांकडे 12 कोटी तर ग्रामीण भागात 48 कोटी असे अवघे 60 कोटी रुपये शिल्लक आहे.
त्यामुळे स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेकडे साडेतीनशे कोटी रुपयांची मागणी केलीय. ही रक्कम दोन दिवसांत मिळाली नाही तर एटीएमपाठोपाठ बँकांही ड्राय होण्याची भीती व्यक्त होतेय.