मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

Updated: Jul 8, 2014, 05:27 PM IST
मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज title=

औरंगाबाद: रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

औरंगाबाद मराठवाड्याला या बजेटमधून काहीही मिळालेलं नाही. मराठवाड्यात पर्य़टनाच्या निमित्तानं हजारो पर्यटक येतात. मात्र थेट मुंबईशी कनेक्टीव्हीटी असलेली फक्त एक गाडी औरंगाबादसाठी आहे. पुण्यासाठी एकही नाही. औरंगाबाद शहराचा होत असलेला विकास, इथला मोठा पर्य़टन उद्योग आणि रेल्वे देत असलेल्या सुविधा यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही. त्यामुळं मराठवाड्याचा विचार करता अच्छे दिन नाहीत अशीच भावना जनतेची आहे. 

 
20 वर्षांपासून रखडलेले रेल्वे मार्ग

  •  *रोटेगाव पुणतांबा 30 किलोमीटर
  • *जालना खामगाव 165 किलोमीटर
  • *मनमाड मालेगाव इंदूर 350 किलोमीटर
  • *वर्धा यवतमाळ नांदेड, 270 किलोमीटर
  • *नांदेड बीदर 150 किलोमीटर
  • *नगर बीड परळी 250 किलोमीटर
  • *सोलापूर औरंगाबाद जळगाव 450 किलोमीटर

 

यापैकी एकाही मार्गाचा रेल्वे बजेटमध्ये विचार झाला नाही. 

औरंगाबादहून एकाही नव्या गाडीची घोषणा झाली नाहीये. औरंगाबाद ते मुंबई दिल्ली या प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुरु करण्याची मागणी होती. पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या गाड्यांची मागणी होती या मागण्यांचा विचारच झाला नाहीये. गोपीनाथ मुंडे याचं स्वप्न असणाऱ्या नगर- बीड- परळी मार्गाचाही विचार झाला नाही. त्यामुळं फक्त औरंगाबाद चाळीसगाव सर्वेच्या गाजराशिवाय काहीही मिळालं नसल्याची टीका आता सुरु झालीये..

शिवसेनाही रेल्वे बजेटवर नाराज आहे. आता आपण सदानंद गौडांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या देऊ असं खासदार म्हणताहेत. रेल्वे विकास समितीने या बजेटवर नाराजी व्यक्त केलीय. 

भौगोलिकदृष्ट्या मराठवाडा हा देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. पण मराठवाड्याच्या सर्वच मागण्या रेल्वेमंत्र्यानी सायडींगला टाकल्यामुळं मराठवाड्यात नाराजी आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.