निकालानंतर भाजपला आली शिवसेनेची आठवण

 कोल्हापुरात निवडणूक संपताच भाजपला आपले मित्र पक्षाची आठवण झाली आहे. विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन भाजपचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केलंय.

Updated: Nov 2, 2015, 07:46 PM IST
निकालानंतर भाजपला आली शिवसेनेची आठवण title=

कोल्हापूर :  कोल्हापुरात निवडणूक संपताच भाजपला आपले मित्र पक्षाची आठवण झाली आहे. विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन भाजपचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केलंय.

कोल्हापूर महापालिकेसाठी रविवारी तब्बल 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती. भरघोस मतदानाच्या जोरावर निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांनी लागली होती. मात्र, काँग्रेसने आघाडी घेत सर्वाधिक 27 जागा जिंकल्या आहे. राष्ट्रवादीने 15 जागा जिंकल्या तर भाजपने 12 आणि ताराराणी आघाडीने 20 जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेनं फक्त 4 जागांवर विजयी झाली आहे.

कोल्हापुरात मॅजिक फिगर पार करण्यासाठी 41 जागांचा आकडा कुणालाही गाठता आला नाही. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आता शिवसेनेचे आठवण झालीये. विकासासाठी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून टाकलंय. पण त्याचं बरोबर महापौर हा भाजपचाच होणार असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेना -भाजपमध्ये चांगलाच सामना रंगला होता. चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली होती, तर ही मागणी करणार्‍या नीलम गोर्‍हे कोण? असा उलट सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला होता. तसंच गेल्या 25 वर्षांपासून आम्ही शिवसेनेला सहन करतोय, पण लवकरच आमचा घटस्फोट होऊ शकतो, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. पण आता निवडणूक संपताच भाजपला पुन्हा आपल्या मित्र पक्षाची आठवण झाल्याचं चित्र दिसत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.