औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका युवकाला दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. यानंतर त्याला ए.एन.आय.च्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात आहेत का ? याची माहिती दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.
मराठवाड्यात आयसिसचे कनेक्शन असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिली होती. त्यानुसार ATSची करवाई सुरु असल्याचं समजतंय. याआधीही महाराष्ट्रातील अनेक भागातून काही तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याने कारवाई केली होती.