कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

Updated: May 17, 2017, 09:39 AM IST
कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का? title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याता भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन खेडला, खेडवरुन चिपळून मार्गे ही संघर्ष यात्रा जाणार आहे.

सावर्डे येथे दुपारी सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही यात्रा रत्नागिरीकडे रवाना होईल. या यात्रेला पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित रहाणार आहेत. तर  गेल्या दोन संघर्ष यात्रेकडे पाठ फिरवणारे ज्येष्ठ नेते नारायण राणे कोकणात होणाऱ्या या संघर्ष यात्रेत सहभागी होणार का याकडे सा-यांचं लक्ष लागले आहे.