उस्मानाबाद बस अपघात ५ ठार तर १५ जण जखमी

एसटी आणि दुसरी एक बस यांच्यात झालेल्या अपघातात ५ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत. आज सकाळी हा अपघात  पुणे - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवर अपघात झाला.

Updated: Dec 23, 2016, 09:38 AM IST
उस्मानाबाद  बस अपघात ५ ठार तर १५ जण जखमी title=

उस्मानाबाद  : एसटी आणि दुसरी एक बस यांच्यात झालेल्या अपघातात ५ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत. आज सकाळी हा अपघात  पुणे - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवर अपघात झाला.

उमरगा जवळील येनेगुर जवळ हा अपघात झाला. उमरगा डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती तर कर्नाटकची बस उमरगा दिशेने जात होती. यावेळी उमरगा- नळदुर्ग रस्त्यावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली.

 या अपघातात दोन्ही बसचे चालक मृत्यू पावलेत. तर १५ जण जखमी झालेत. जखमींमध्ये प्रवाशांचा समावेश आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.