पंढरपूर : विठ्ठलाचा नित्योपचार ३ जुलैपासून सुरू

२४ तास दर्शन सुरु ठेवण्याच्या निर्णयानंतर बंद करण्यात आलेला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील श्रीविठ्ठलाचा नित्योपचार ३ जुलै पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Jun 29, 2015, 04:14 PM IST
पंढरपूर : विठ्ठलाचा नित्योपचार ३ जुलैपासून सुरू title=

पंढरपूर : २४ तास दर्शन सुरु ठेवण्याच्या निर्णयानंतर बंद करण्यात आलेला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील श्रीविठ्ठलाचा नित्योपचार ३ जुलै पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली.  झी २४ तासनं याबाबत वृत्त दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. नित्योपचार बंदच्या विरोधात वारकरी संप्रदायाने मोर्चा काढून निषेध नोंदवला होता. 

दर्शनासाठी वाट पाहू मात्र नित्योपचार बंद करू नये अशी वारक-यांची मागणी केली होती. जिल्हाधिकारी मात्र नित्योपचार बंद वर ठाम होते. वारक-यांची मागणी झी २४ तासने लावून धरली होती. 

अखेर प्रशासनानं आडमुठी भूमिका मागे घेत श्रीविठ्ठलाचा नित्योपचार ३ जुलै पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. वारकरी पाईक संघाच्या आंदोलनाला या निर्णयामुळं यश आलंय. वारक-यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.