मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन'

मुबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने आपात्कालीन स्थितीसाठी लोकलमधील महिला डब्यांमध्ये 'पॅनिक' बटनची सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पॅनिक बटणची सेवा अमलात आणली. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर एकाच लोकलमधील पाच महिलांच्या डब्यांत सुरू केली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांची संख्या वाढवली जाईल.

Updated: May 29, 2016, 02:02 PM IST
मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन' title=

मुबई : मुबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने आपात्कालीन स्थितीसाठी लोकलमधील महिला डब्यांमध्ये 'पॅनिक' बटनची सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पॅनिक बटणची सेवा अमलात आणली. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर एकाच लोकलमधील पाच महिलांच्या डब्यांत सुरू केली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांची संख्या वाढवली जाईल.

लोकलच्या प्रवासात अनेकदा महिलांना असुरक्षित वाटते. प्रवासात एकट्या महिलेस आपात्कालीन परिस्थितीत या पॅनिक बटणमुळे मदत होणार आहे. माटुंगा कार्यशाळेतील विद्युत विभागाच्या अस्मिता श्रीवास्तव आणि सूद मावेश या दोन अधिकाऱ्यांनी पॅनिक बटणच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला.  आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे बटण दाबताच त्याच डब्याबाहेरील निळा लाईट सुरू होईल. त्यानंतर गजर वाजण्यास सुरुवात होईल. त्यामुळे बाजूने एखादी लोकल जात असल्यास किंवा एखाद्या स्टेशनवर लोकल थांबल्यास त्या आवाजाने धोक्याची सूचना स्टेशन मास्तर, कर्मचाऱ्यांना वा इतर प्रवाशांनाही मिळेल. पॅनिक बटण वाजताच मोटरमनच्या केबिनमध्येही निळ्या रंगाचा दिवा लागेल.

ही सेवा महिलांना नक्कीच एकट्याने प्रवास करतांना उपयुक्त ठरणार असल्याचे माटुंगा कार्यशाळेचे मुख्य व्यवस्थापक महेश कुमार यांनी सांगितले. ही यंत्रणा अमलात आणण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागल्याचे त्यांनी सांगितले. सध्या, एकाच लोकलच्या पाच महिला डब्यांना ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. तर, दर महिन्याला एका लोकलमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न राहणार आहेत