पनवेलमध्ये शेकाप विरुद्ध भाजप, आरोप-प्रत्यारोप

पनवेल महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलच तापू लागले आहे. पनवेल महापालिकेत खरी लढाई ही भाजप विरुद्ध शेकाप आघाडी यांच्यात आहे.

Updated: May 2, 2017, 11:27 PM IST
पनवेलमध्ये शेकाप विरुद्ध भाजप, आरोप-प्रत्यारोप title=

नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलच तापू लागले आहे. पनवेल महापालिकेत खरी लढाई ही भाजप विरुद्ध शेकाप आघाडी यांच्यात आहे.

जसजसं निवडणुकीचं वातावरण तापतंय तसतशी इथली राजकीय चिखलफेक वाढू लागयीये.. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी खारघर मधील आमदार प्रशांत ठाकूर यांची कामं दाखवा आणि रुपये मिळवा असं आवाहन केलंय.

तर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकाप ने ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. तर शेकाप ने केलेल्या आरोपाच खंडन करत  आमदार निधीतून  विकास कामं केल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.