पेण अर्बन बँक ठेवीदारांना आजपासून मिळणार पैसे परत

कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. 

Updated: Sep 8, 2015, 10:40 AM IST
पेण अर्बन बँक ठेवीदारांना आजपासून मिळणार पैसे परत title=

मुंबई : कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. 

पेण अर्बन बँकेच्या ५ वर्षांपूर्वी उघडकीस आला. सुमारे ७५० कोटी रूपयांच्या महाघोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. जवळपास २ लाख ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये या घोटाळ्यात अडकून पडले. हे पेसे परत मिळावेत यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून रस्त्यावर आणि न्यायालयात लढा सुरू आहे.

आता न्यायालयीन लढाईत यश मिळत आहे. बँकेने वसूल केलेल्या ५४ कोटी रूपयांतून १० हजार रूपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे परत करावेत, असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यानुसार आजपासून या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.