उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा, दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यातल्या पांगरमल गावात उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा झाल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही विषबाधा बनावट दारुचे वाटप केल्याचे सांगण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2017, 08:00 AM IST
उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा, दोन जणांचा मृत्यू title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या पांगरमल गावात उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा झाल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही विषबाधा बनावट दारुचे वाटप केल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदनगरमधील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी नगर तालुक्यातील पांगरमल गटातील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराने गावातील लोकांना पार्टी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर दारू देखील देण्यात आली. 

मात्र, बनावट दारुमुळे विषबाधा होऊन राजेंद्र आंधळे आणि पोपट आव्हाड या दोन जणांचा मृत्यू झालाय. तर ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.