गाईच्या दुधाने ८१ जणांना विषबाधा?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2017, 01:19 PM IST
गाईच्या दुधाने ८१ जणांना विषबाधा? title=

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झाली आहे.  गायीच्या दुधातून ही विषबाधआ झाल्याचं सांगितलं जातंय. ज्या गायीचं दुध या लोकांनी प्यायलं.

 त्या गायीला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला होता. त्यामुळंच ही विषबाधा झाली असण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

विषबाधा झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकूण २० कुटुंबात या गाईचं दूध वाटण्यात आलं होतं, यानंतर ८१ जणांना विषबाधा झाली. 

सर्वांवर उपचार सुरू आहेत, तसेच सर्वांची प्रकृती ठिक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. नेमकं असं काय झालं की ८१ जणांना विषबाधा झाली, याची प्राथमिक चौकशी होण्याची शक्यता आहे.