नाशिकमध्ये आंदोलनकर्त्यांना गाडीत नेलं फरफटत

त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत दुजाभाव होत असल्यानं आणि राजकीय अतिक्रमणांना संरक्षण मिळत असल्यानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं.

Updated: Jan 26, 2017, 04:12 PM IST
नाशिकमध्ये आंदोलनकर्त्यांना गाडीत नेलं फरफटत title=

नाशिक : त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत दुजाभाव होत असल्यानं आणि राजकीय अतिक्रमणांना संरक्षण मिळत असल्यानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं.

जमाव बंदीचा आदेश असताना मोर्चा काढल्यानं सर्व आंदोलनकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास हे आंदोलन सुरु होतं. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी जबरदस्तीनं त्यांना ताब्यात घेतलं. आणि  काही आंदोलनकर्त्यांना गाडीत फरफटत नेलं.