कल्याण : व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणा-या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य मआरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे.
रात्रीच्या गस्तीवेळी पोलिसांना तो कल्याणच्या रामबाग परिसरात आढळला. चौकशीअंती हा सर्व प्रकार उघड झाला. 5 ऑगस्टला बिहारमध्ये छपरा जिल्ह्यातल्या मेकर गावात दोन समुहांत दंगल उसळली होती. या दंगलीत मोठ्या प्रमाणात घरांची जाळपोळ आणि नुकसान करण्यात आलं होतं. यात डिस्ट्रिक मॅजिस्ट्रेसह अनेक पोलीसही जखमी झाले होते.