उल्हासनगर : सोशल मीडियावर रविवार एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन पोलिस एका युवकाला मारहाण करीत आहेत. उल्हासनगरमधील एक सिनिअर इन्स्पेक्टर रस्त्यावर युवक आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण करतोय.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
एसआय मोहन वाघमारे यांनी एका न्यूज पेपरला सांगितलं, आम्ही कोणतंही त्रास देण्याचं काम केलेलं नाही, या व्हिडीओत काहीतरी बदल केलाय. युवक आणि युवतीविरोधात अश्लीलता पसरवण्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. युवक आणि युवतीचं हे वागणं सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय असावं, म्हणून काही लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
वाघमारे आणि एका पोलिस कॉन्स्टेबलने दिलेल्या माहितीनुसार, एका उभ्या असलेल्या रिक्षात हे कपल बसलं होतं, तक्रारीनुसार या कपल्सच्या बाजूला बिअरची बाटलीही होती. परिसरातील काही लोकांच्या मते या कपलची चूक होती.
मात्र व्हिडीओत पोलिसांनी शिव्या आणि मारहाण केल्याचं दिसून येत आहे. काहींच्या मते पोलिसांनी त्यांना सरळ मारहाण न करता इशारा द्यायला हवा होता, या घटनेविषयी लोकांची वेगवेगळी मतं आहेत.