बीड : सर्वसामान्यांसह नेतेमंडळीसुद्धा भाऊबीज साजरी करण्यात दंग झालेत... ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही भाऊबीज साजरी केली..
पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना ओवाळत त्यांना मंत्रीपद मिळावं अशा शुभेच्छा दिल्यात.. तर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी विचारलं तेव्हा पंकजा आपल्या भगिनी असून आपला वीक पॉइंट आहेत असं सांगितल्याचं जानकर यांनी सांगितलं..
मंत्रीपद मिळालं नाही तरी बहिणीवरील प्रेम कायम राहिल असं जानकरांनी म्हटलंय.. तसंच दिल्लीच्या राजकारणात रस असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.