शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच बलात्कार, आरोपी पोलिसांना शरण

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुरजूक अखेर पोलिसांना शरण आला आहे.  इनायत याने आपल्या नात्यातील मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. 

Updated: Aug 31, 2016, 11:45 AM IST
शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच बलात्कार, आरोपी पोलिसांना शरण title=

अलिबाग : महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुरजूक अखेर पोलिसांना शरण आला आहे.  इनायत याने आपल्या नात्यातील मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. 

शिवाय त्याची विडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल करत राहिला. अखेर त्या पीडित तरुणीने महाड पोलिसात तक्रार दिली. इनायतने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण न्यायालयाने त्याला जामीन नाकारून देखील पोलीस त्याला अटक करत नव्हते. 

इनायत महाड परिसरातील  मोठे प्रस्थ आहे. त्याची गोरेगावजवळ 1 शाळा देखील आहे. अखेर झी 24 तासने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच 24 तासाच्या आत इनायत मंगळवारी संध्याकाळी महाड पोलिसांना शरण आला, पोलिसांनी त्याला अटक केली असून बुधवारी त्याला माणगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.