गरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण

 पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन हत्या करण्यात आलीय. हत्येनंतर दीड लाख रुपयांच्या खडंणीसाठी अडीच वर्ष्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने नालासोपाऱ्यात भीती पसरली आहे.

Updated: Aug 21, 2015, 04:01 PM IST
गरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण title=

नालासोपारा : पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन हत्या करण्यात आलीय. हत्येनंतर दीड लाख रुपयांच्या खडंणीसाठी अडीच वर्ष्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने नालासोपाऱ्यात भीती पसरली आहे.

दरम्यान, पोलिसांनी १२ तासांच्या आत अरोपीसह अपहरण झालेला मुलाला ताब्यात घेतले आहे. नालासोपारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गटकीबाई अंबालाल् देवासी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

या महिलेची हत्या नालासोपारा पश्चिम हनुमाननगर येथील साई सहारा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत्या घरी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.