एका भिंतीसाठी चक्क ३२ वृक्षांची कत्तल

बातमी कोल्हापूरची...एक कपाऊंड वॉल बांधण्यासाठी तब्बल ३२ झाडांची कत्तल झाल्याचं समोर आलंय.

Updated: Nov 26, 2014, 07:48 PM IST
एका भिंतीसाठी चक्क ३२ वृक्षांची कत्तल title=
संग्रहीत

 कोल्हापूर : बातमी कोल्हापूरची...एक कपाऊंड वॉल बांधण्यासाठी तब्बल ३२ झाडांची कत्तल झाल्याचं समोर आलंय.

कोल्हापूर शहरातल्या कसबा बावडा इथं कोर्टाची ही इमारत उभारली जातेय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे बांधकाम केलं जातंय. इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून आता केवळ कपाऊंड वॉलचं काम बाकी आहे. मात्र या कपाऊंडच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बेकायदेशीरपणे ३२ झाडांची कत्तल केल्याचं उघडकीस आलंय. यामध्ये चंदनाच्या झाडांबरोबर इतर झाडांचा समावेश आहे. 

वास्तविक पाहता महाराष्ट्र झाडे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ नुसार विना परवाना वृक्षतोड करणं कायद्यानं गुन्हा आहे. हे माहीत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागानं झाडांची कत्तल केलीय. याप्रकरणी कोल्हापूर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस दिलीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत खुलासा मागवलाय.
 
ज्या इमारतीत न्याय निवाडा चालणारेय, त्याच इमारतीच्या कंपाऊंड वॉलच्या बांधकामासाठी कायदा धाब्यावर बसवला जातोय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.