स्वस्त तूरडाळ सरकारची घोषणा फसवीच

 महागाई कमी करु, अशी घोषणा देत भाजप सत्तेवर आले. काँग्रेसच्या काळात महागाईने सामान्यांना लुटले. भाजप अच्छे दिन आणणार, असे आश्वासन दिले. मात्र, आता सणाता सामान्य ग्राहकांच्या हातावर भाजप सरकारने तुरी दिलेय. १०० रूपये किलो तुरडाळीची सरकारची घोषणा फसवीच दिसून येत आहे. भाजपचे स्वस्त तुरडाळीचे स्टॉल्स गायब झाले आहेत.

Updated: Nov 6, 2015, 09:05 PM IST
स्वस्त तूरडाळ सरकारची घोषणा फसवीच title=

पुणे : महागाई कमी करु, अशी घोषणा देत भाजप सत्तेवर आले. काँग्रेसच्या काळात महागाईने सामान्यांना लुटले. भाजप अच्छे दिन आणणार, असे आश्वासन दिले. मात्र, आता सणाता सामान्य ग्राहकांच्या हातावर भाजप सरकारने तुरी दिलेय. १०० रूपये किलो तुरडाळीची सरकारची घोषणा फसवीच दिसून येत आहे. भाजपचे स्वस्त तुरडाळीचे स्टॉल्स गायब झाले आहेत.

राज्याचे अन्न आणि पुरवठामंत्र्यांनी दिलेलं हे आश्वासन हवेत विरुन ४८ तास उलटून गेलेत, मात्र अजूनही राज्यातील ग्राहकांना १०० रुपये किलोने तूरडाळ उपलब्ध झालीच नाही. मुंबईच्या भाजप कार्यालयात गुरुवारी मोठ्या थाटामाटात १०० रुपये  किलोने डाळविक्री सुरु झाली. खरी मात्र शुक्रवारी कार्यालयात विक्री बंद असल्याचं दिसून आलं.

गुरुवारचा कार्यक्रम हा फक्त उद्घाटनाचा असल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं. मात्र आता भाजपचे १०० स्टॉल्स आहेत तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झालाय. पुण्यातही काही वेगळी स्थिती नाही. जप्त झालेली डाळच केवळ १०० रुपये किलोने उपलब्ध होणार असल्यानं पुणेकरांच्या वाट्याला अवघी ६३ किलो तूरडाळ येणार आहे. 

अख्ख्या पुण्यामध्ये सुमारे १५०च्या वर छापे मारुन किती किलो तूरडाळ जप्त झाली माहिती आहे..? फक्त ६३ किलो म्हणजे बोटावर मोजण्याइतक्या भाग्यवंतांनाच १०० रूपये किलोनं तूरडाळ मिळणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा यावर संताप होतोय.  
 
तुरदाळीच्या वाढत्या किंमतीमुळे विरोधकांनीही सरकारवर सडकून टीका केलीय आहे. तर शिवसेनेनेही दंड थोपटले होते. मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्याना आश्वासनही दिले. मात्र, १०० रुपये दराने डाळ उपलब्ध झालेली नाही. डाळीचे भाव चढेच दिसून येत आहेत. परवा ४८ तासांत स्वस्तात डाळ उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांची भाषाही आता बदललीय. त्यामुळे आता सरकारच २-३ दिवस थांबा, रिझल्ट दिसतील. असं म्हणत असेल तर सरकारच्या घोषणांवर कितपत विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित होतोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.