पुणे : आंबिल ओढ्यात वाहून गेलेल्या गणेश चंदने याचा मृतदेह कसबा पेठ पंपिंग स्टेशनजवळ सापडला आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास गणेश आंबील ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना चेंडू काढण्यासाठी गणेश ओढ्यात उतरला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला.
अग्निशमन दल आणि सांडपाणी विभागाकडून रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. मात्र त्यांना यश मिळत नसल्यानं शोधकार्य थांबवण्यात आलं. अखेर आज कसबा पेठ पंपिंग स्टेशनजवळ त्याचा मृतदेह आढळला. गणेशचे आईवडील मोलमजूरी करतात.