पुण्याचा 'मिसळ महोत्सव', आज शेवटचा दिवस

सिंहगडाच्या पायथ्याशी सध्या मिसळ महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला खवैय्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

Updated: Oct 9, 2016, 11:27 AM IST
पुण्याचा 'मिसळ महोत्सव', आज शेवटचा दिवस title=

पुणे : सिंहगडाच्या पायथ्याशी सध्या मिसळ महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला खवैय्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

डोणजे गावातील आमराई  फार्म्समध्ये हा महोत्सव रंगला आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा महोत्सव असणार आहे. आज रविवारी या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.

तीन दिवसांचा हा मिसळ महोत्सव आहे, आजचा शेवटचा दिवस आहे, तेव्हा सिंहगडाच्या पायथ्याशी आमराईत मिसळीची चव तुम्हाला चाखता येणार आहे. 

गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे हा महोत्सव भरवण्यात आला आहे.

गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल दम मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही तर्रीदार मिसळ येथे मिळणार आहे.  तुम्हाला हवी तशी मिसळ येथे मिळणार आहे.