एटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून

एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Dec 24, 2014, 02:05 PM IST
एटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून title=

पुणे : एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

सागर दळवी, बाबू सकट, रोहन दळवी आणि अजय राबाडे अशी या आरोपींची नावं आहेत. तर रामहरी ननवरे हा पाचवा साथीदार अजूनही फरार आहे. 

१४ डिसेंबर रोजी एटीएम लुटण्यासाठी या टोळीनं ‘ओला’ या कंपनीत कॉल करुन झायलो गाडी मागवली. गाडी आल्यावर झायलोचा चालक किरण सोनवणे यांच्या डोक्यात गजानं वार करुन त्यांनी त्याचा खून केला. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर आपला गुन्हा लपवण्यासाठी या टोळक्यानं किरणचा मृतदेह लोणी पाटी येथील कऱ्हा नदीत फेकून दिला. 

पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन सर्वात आधी सागर दळवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर साथीदारांचंही भांड फोडलं. त्यानंतर पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.