एआयबी विरोधात पुण्यात गुन्हा, सोनाक्षी, दीपिकाही आरोपी

पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वादग्रस्त एआयबी शो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४  जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला असून, यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचाही समावेश आहे. 

Updated: Feb 5, 2015, 11:14 PM IST
एआयबी विरोधात पुण्यात गुन्हा, सोनाक्षी, दीपिकाही आरोपी title=

पुणे : पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वादग्रस्त एआयबी शो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४  जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला असून, यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचाही समावेश आहे. 
 
यात दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह याचसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हाचा देखिल समावेश आहे.
 
४ हजार रुपयांचं तिकीट काढून अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला. मुंबईत झालेला एआयबी शो अश्लिल विनोदांनी आणि अर्वाच्च शिव्यांनी भरलेला होता.  हा कार्यक्रम मुंबईत सादर करण्यात आला होता, या कार्यक्रमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर आल्यानंतर वादाला सुरूवात झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.