पुणे : किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीचा रुपांतर २ गटांतील धुमश्चक्रीची घटना पुण्यात घडलीय. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झालंय. यामध्ये ४ जण जखमी आहेत.
पुण्यातील पर्वती दर्शन भागात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. आज सकाळपासून परिसरातील जनजीवन सुरळीत असलं तरी सामन्य नागरिकांमध्ये काहीसे भीतीचं वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.