पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू

दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Updated: Aug 1, 2015, 10:31 PM IST
पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू title=

 रत्नागिरी : दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

कर्दे येथील समुद्र किनारी पुणे येथील दिघीतील दोघे समुद्रात उतरलेत. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दिघीतील अक्षय मोरे, रवी पाटील अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना दापोलीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.