एकाला मंत्रीपद दिलं तर दुसरा नाराज होणार हे उघड

यश मिळाल्यानंतर ते पचवायला ही यावं लागत. पिंपरी चिंचवड मधल्या भाजप नेत्यांना कदाचित त्याचा विसर पडलेला दिसतोय

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 28, 2017, 08:51 PM IST
एकाला मंत्रीपद दिलं तर दुसरा नाराज होणार हे उघड title=

पिंपरी-चिंचवड : यश मिळाल्यानंतर ते पचवायला ही यावं लागत. पिंपरी चिंचवड मधल्या भाजप नेत्यांना कदाचित त्याचा विसर पडलेला दिसतोय...! महापालिका निवडणुकीत अनपेक्षितपणे घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप आमदारांमध्ये सर्वच पातळ्यांवर सुरु झालेला संघर्ष तेच सिद्ध करतोय

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पिंपरी चिंचवड भाजपने पार उध्वस्त केला. त्यामुळे आता भाजपच्या गटातटात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता जगताप, लांडगे गटांना लाल दिव्याचेही वेध लागलेत. 

लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यात महापौर पदापाठोपाठ लाल दिव्यासाठीही संघर्ष सुरू झालाय. त्यातच आता आमदार बाळा भेगडे यांचंही नाव चर्चेत आलंय. सलग तीनवेळा निवडून आलेल्या भेगडे यांनी तळेगाव नगरपालिका भाजपला मिळवून दिलीय. त्यामुळे तेही लाल दिव्यासाठी वेटींगवर आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून पिंपरीमध्ये दोन्ही आमदारांपैकी एकाला मंत्रीपद दिलं तर दुसरा नाराज होणार हे उघड आहे. त्यामुळे ती रिस्क मुख्यमंत्री घेणार का हा प्रश्नच आहे.