नाशिक : ट्रेनमधून प्रवास करताना त्या दोघांनी तिकीट काढलं नाही आणि टीसीनं त्याबद्दल विचारल्यावर टीसीवरच चाकूनं वार करुन त्याला जखमी केलं. ही घटना घडलीय. हावडा एक्सप्रेसमध्ये नाशिकजवळ. या घटनेनंतर टीसींमध्ये घबराट पसरली आहे.
तिकीट चेकर चुन्नीलाल गुप्ता यांच्यावर रेल्वेत हल्ला करण्यात आला. ते खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. हावडा एक्प्रेस्म्ध्ये बुधवारी रात्री भुसावळ ते कल्याण या मार्गावर ते कर्तव्य बजावत होते. नाशिक रोड रेल्वेस्थानकातून गाडी सुटताच एस ५ या बोगीत आलेल्या दोघा प्रवाशांकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली. त्यातला एक विदाऊट तिकीट प्रवास करत होता. त्यामुळे दोघांनी टीसीशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यातूनच चक्क धारदार ब्लेडनं वार करायला सुरुवात झाली. हे दोघेही महिलांना लुटण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना हाकलल्यामुळेच त्यांनी हल्ला केल्याचं टीसीटं म्हणणं आहे.
मध्यरात्रीच्या सुमाराला हावडा पासून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या पल्ल्याच्या गाडीत रेल्वे सुरक्षा दलाचा एकाही जवान नव्हता अशी तक्रार तिकीट चेकर संघटनेचे पदधिकारी करतायत. मागच्या महिन्यात अशाच प्रकारच्या एका घटनेत एका टीसीचा म-त्यू झाला होता.
अशा घटनांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची धोक्यात आल्याचे दिसत आहे. तसेच सुरक्षा असूनही त्याचा काही उपयोग होत नाही, हेच या घटनेवरुन दिसत आहे. सुरक्षिततेसाठी कडक धोरण हवे, अशी मागणी इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशन या संघटनेचे सचिव योगेश पंडित, टीसी संघटना पदाधिकारी टी. बी नुंगसे यांनी केली आहे.
टीसीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास सुरू झालाय. या आधीही रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांवर हल्ला झाल्याच्या घटना घडलाय. मात्र त्यातील बहुतांश घटनामध्ये त्याचा पुढे ना तपास लागतो ना आरोपींना अटक होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.