गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

कोकणवासियांना गणेशोत्सवानिमित्तानं मध्य रेल्वेनं एक भेट दिली आहे. मध्य रेल्वेकडून पहिल्यांदाच सोडण्यात येणा-या पनवेल ते चिपळूण गाडीमध्ये एक एसी डबा जोडण्यात आलाय.

Updated: Sep 4, 2015, 11:16 PM IST
गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु title=

पनवेल : कोकणवासियांना गणेशोत्सवानिमित्तानं मध्य रेल्वेनं एक भेट दिली आहे. मध्य रेल्वेकडून पहिल्यांदाच सोडण्यात येणा-या पनवेल ते चिपळूण गाडीमध्ये एक एसी डबा जोडण्यात आला आहे.

ही गा़डी सकाळी 11.10 वाजता पनवेलहून सुटली. ती चार वाजता चिपळूणला पोहोचेल. तर रात्री 10.30 वाजता चिपळूणहून सुटेल आणि रात्री 10.30 वाजता पनवलेला पोहचेल. आजपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येतेय. 

पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेड, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या ठिकाणी ही गाडी थांबेल. 
या डेमू गाडीचं भाडं ५० रुपयांपासून सुरु आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.