कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस

 नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.

Updated: Nov 22, 2015, 08:24 PM IST
कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस title=

ठाणे :  नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.

मुंबई शहरात शनिवारी रात्री चांगलाच पाऊस झाला, महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश या भागात गारपीटीची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही सावधानता ठेवणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.