पुणे : शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात १ जुलैपासून पावसाची जोर वाढला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात १ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला किमान २० दिवस पुरेल एवढे साठले असल्याचं सांगण्यात येतंय.
रविवारी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे ३ तासांत खडकवसाला येथे ३ मिलिमिटर पाऊस झाला. जून महिन्यात एकूण ३६ मिलिमिटर पाऊस झाला. पानशेत ४०, वरसगाव ४६, टेमघर ५८ मिलिमिटर पाऊस पडला आहे. पानशेत धरणाची पातळी ८ फुटाने वाढली आहे. तर वरसगाव धरणाची पातळी साडेतीन मीटरने वाढली आहे.