पुणे : विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे.
घाटकोपर पश्चिमचे आमदार असलेले राम कदम पुण्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शहा यांनी स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून राम कदम हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.