मुंबई / अहमदनगर : रामनवमी उत्सवात साई नामाच्या गजराने साईनगरी दुमदुमली. रामनवमी उत्सवाला काकडआरतीने सुरूवात झाली. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. तर मुंबईतील वडाळा राम मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
साई नामाच्या गजराने सुंपुर्ण शिर्डी दुमदुमुन गेली आहे. आज उत्सवाचा पहिला दिवस असल्याने रात्री साईंच्या पालखीची गावातुन मिरवणूक काढली जाणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांनी तसेच फळांनी केलेली सजावट भाविकांच लक्ष वेधुन घेत आहे. साईमुर्तीलाही विवीध अलंकारांनी सजविण्यात आलय शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला पहाटेच्या काकड आरतीने सुरुवात झाली.
देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव आणि पालखीच एक वेगळ नात असल्याने या उत्सवासाठी खास करुन मुंबईहून अनेक पालखी दाखल होतात. पंधरा दिवसांचा पायी प्रवास करुन शिर्डीत येऊन साईंच्या दर्शनासाठी भाविक आतूर झालेला दिसून येतोय.
मुंबईतील प्रतिशिर्डी अर्थात वडाळ्यातही रामनवमी निमित्त विवध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. वडाळ्यात भक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ठाण्यातील शिवाजी मैदानात " चैत्र नवरात्रोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवाचे यंदाचे हे अठरावे वर्ष आहे.
हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची प्रचीत्ती आहे आणि यामुळेच दरवर्षी भक्तजनानच्या संख्येत वाढ होताना दिसते. सर्वात म्हत्वाचे म्हणजे या देवीच्या उत्साहाच्या रूपाने आपली संस्कृती व व परंपरा जपण्याचे काम हे मंडळ करते. त्यासाठीच खासकरून भोंडलाचे आयोजन करण्यात आले होते. या देवीच्या दर्शनाला महाराष्ट्रचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. महाराष्ट्रावरील सर्व संकट दूर व्हावं असा आशिर्वादही त्यांनी यावेळी मागितला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.