पुण्यात साकारली ५१ लाख किमतीची सोन्याची पैठणी

सोनं आणि पैठणी हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र पैठणी सोन्याची असेल तर. हा योग महिलांसाठी जणू 'सोने पे सुहागा' असाच म्हणावा लागेल. कारण पुण्यातील रांका ज्वेलर्सनं सोन्याची पैठणी साकारलीय.

Updated: Mar 18, 2015, 04:58 PM IST
पुण्यात साकारली ५१ लाख किमतीची सोन्याची पैठणी  title=

पुणे: सोनं आणि पैठणी हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र पैठणी सोन्याची असेल तर. हा योग महिलांसाठी जणू 'सोने पे सुहागा' असाच म्हणावा लागेल. कारण पुण्यातील रांका ज्वेलर्सनं सोन्याची पैठणी साकारलीय.

जगातील पहिलीवहिली सोन्याची पैठणी बनवल्याचा दावा रांका ज्वेलर्सनं केलाय. दीड किलो सोनं वापरुन ही पैठणी बनवण्यात आलीय. ३५ कारागिरांनी तीन महिने मेहनत करुन ही पैठणी साकारलीय. साडीच्या बॉर्डरवर, काठावर सोन्याची नक्षी पाहायला मिळते. तर साडीवरील बुट्ट्याही सोन्याच्या आहेत.

या पैठणीची किंमत ५१ लाख रुपये इतकी आहे. एका ग्राहकाच्या मागणीवरुन ही पैठणी साकारण्यात आली. रांका ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसेडर विद्या बालन हिनं या पैठणीचं लॉन्चिंग केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.