आता पुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा

नागराज शिंदे या माजी न्यायाधीशावर एका 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील कात्रज परिसरात राहत असलेल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. 

Updated: Aug 7, 2014, 01:24 PM IST
आता पुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा title=

पुणे : नागराज शिंदे या माजी न्यायाधीशावर एका 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील कात्रज परिसरात राहत असलेल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. 

दरम्यान माजी सत्र न्यायाधीश नागराज शिंदे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित माजी न्यायाधीशानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. त्यावर आज सुनावणी आहे.

ही मुलगी शिंदे यांच्या शेजारच्या सोसायटीत राहते. तिला घरात बोलावून त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं. याआधी भोपाळ उच्च न्यायालयातील न्यायाधीशावरही बलात्काराचा आरोप आहे. एका महिला न्ययाधीशानंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळं आता न्यायाधीशांवरच बलात्काराचे आरोप होत असताना, न्याय कोणाकडे मागायचा असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.