बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अटकपूर्व जामीन रद्द

राष्ट्रवादीचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू अजित गावडेचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे. 

Updated: May 12, 2016, 10:38 PM IST
बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अटकपूर्व जामीन रद्द title=

शिरुर : राष्ट्रवादीचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू अजित गावडेचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे. 

अजित गावडेवर बलात्काराचा आरोप आहे. या गुन्ह्य़ात त्याला शिवाजीनगर कोर्टाने जामीन अटकपूर्व जामीन दिला होता. मात्र, आता कोर्टाने हा जामीन रद्द केला आहे. 

जामीन देताना घातलेल्या अटी आणि शर्तींचे पालन न केल्याने जामीन रद्द करण्यात आला आहे. तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचे कारण देखील जामीन रद्द करताना कोर्टाने दिलंय.