सांगली : जिल्ह्यातील तासगावमध्ये माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका तरुणीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
नराधम मयुर पवार आणि पीडित तरूणी गेल्या सहा वर्षांपासून डान्स क्लास चालवायचे. 17 ऑक्टोबर रोजी आरोपीने तिला तासगावला घेऊन जात एका खोलीत डांबून ठेवले. तिथे तिला मारहाण करून इलेक्ट्रिक शॉक दिले आणि तिच्यावर बलात्कार केला.
याप्रकरणी पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.
दरम्यान, आरोपी मयुर पवार याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा भाऊ चेतन पवारला धक्का बसला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. नराधम भावानं गुन्हा केला, मात्र दुसऱ्या भावानं जीवन संपवल्यानं सवत्र हळहळ व्यक्त होतेय.