अल्पवयीन मुलीला दारू पाजून मित्राकडूनच बलात्कार, तिघांना अटक

अल्पवयीन मैत्रिणींला दारू पाजून तिच्यावर स्वतःच्या चुलत बहिणीच्या मदतीनं मित्रा बरोबर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बाल अत्याचार अधिनियम, बलात्काराचे आरोप दाखल केले असून त्यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

Updated: Oct 7, 2015, 02:30 PM IST
अल्पवयीन मुलीला दारू पाजून मित्राकडूनच बलात्कार, तिघांना अटक title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे: अल्पवयीन मैत्रिणींला दारू पाजून तिच्यावर स्वतःच्या चुलत बहिणीच्या मदतीनं मित्रा बरोबर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बाल अत्याचार अधिनियम, बलात्काराचे आरोप दाखल केले असून त्यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

अल्पवयीन मुलीवर मित्रानंच विवाहित चुलत बहिणीच्या सहाय्यानंच बलात्कार केल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

अशी घडली घटना

ठाण्यातील हिरानंदानी मेडोस इथल्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला कौस्तुभ चव्हाण या तिच्याच मित्रानं वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्यानं आपल्या विवाहित चुलत बहिणीच्या घरी नेलं. तिथं पीडित मुलीला जबरदस्तीनं दारू पाजून बेशुद्ध करण्यात आलं. त्यावेळी  दिपाली अहिरे या चुलत बहिणीचा मंदार नामक मित्र सुद्धा हजार होता. तिघांनी मिळून पीडित मुलीला बेफाम दारू पाजून तिला बेशुद्ध केलं.

आणखी वाचा - मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड

त्यानंतर पीडितेला काहीच कळलं नाही परंतु घरी गेल्यावर तिला त्रास होऊ लागल्यानं घाबरून घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. तिच्या आईनं तिला तपासणीसाठी घाटकोपर इथल्या राजावाडी इस्पितळात नेलं, जिथं तिच्यावर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं. पीडित मुलीच्या आईनं तिला सोबत घेऊन कोपरी पोलीस स्थानक गाठलं आणि या तीनही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित पाऊलं उचलत तिघांना अटक केली. त्यांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पालकांचे वेळे अभावी आपल्या पाल्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळं अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलंय. 

आणखी वाचा - क्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.